12 documents for election voting
भारत, १९ नोव्हेंबर २४: निवडणूक आयोगाकडून मतदान ओळखपत्र उपलब्ध नसल्यास किंवा ते गहाळ झाल्यास, अशा स्थितीत मतदारांनी काय करावे, हा प्रश्न काही लोकांना पडतो. याबाबत निवडणूक आयोग आणि राज्य माहिती संचलनालयाने माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील माहिती संचलनालयाने मतदान ओळखपत्राऐवजी ओळखीचा पुरावा म्हणून 12 विविध कागदपत्रांची (12 documents for election voting) सूची जाहीर केली आहे. या यादीत आधार कार्डासह अनेक प्रकारच्या दस्तऐवजांचा समावेश आहे.
‘हे’ आहेत 12 प्रकारचे वेगवेगळे ओळखपत्र पुरावे
1. आधार कार्ड
2. मनरेगा रोजगार ओळखपत्र
3. बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबूक
4. पारपत्र (पासपोर्ट)
5. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
6. पॅनकार्ड
7. भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड
8. कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
9. केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज
10. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र
11. संसद सदस्य (खासदार), विधानसभा/विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र
12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
तसेच मोठी बातमी! लॉरेन्स बिष्णोईच्या जवळच्या माणसाला अटक त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
1 thought on “12 documents for election voting: मतदान कार्ड नाहीये? मग ‘या’ ओळखपत्रांचा वापर करून करा मतदान”