(Ajit pawar apologize farmers) अजित पवारांनी मागितली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी
नाशिकमधील जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. लोकसभा निवडणुकीत कांदा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी महायुतीला फटका लावल्यावर हा निर्णय (Ajit pawar apologize farmers) घेण्यात आला.
कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली होती. यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणका दिला होता. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कांदा, सोयाबीन, कापूस या प्रश्नांवर आपली चूक मान्य केली होती.
तसेच कोणत्या जिल्ह्यात ६ लाख शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपये पीक विमा भरपाई मिळणार आहे ते तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.
👉👉या जिल्ह्यामध्ये ६ लाख शेतकऱ्यांना मिळणार ८५३ कोटींची पिक विमा भरपाई👈👈
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारला कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत सांगण्यात आले आहे. ते म्हणाले, “आमची चूक झाली मान्य करतो.”
कांदा उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी पवारांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली असल्याचेही सांगितले.
मात्र, केंद्र सरकारने अद्याप कांद्यावरील निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्य कायम ठेवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अद्याप पूर्णपणे दिलासा मिळालेला नाही.
1 thought on “Ajit pawar apologize farmers: शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे पवारांचे पाऊल”