Narendra Modi came to Maharashtra and apologized
महाराष्ट्र, ३० ऑगस्ट १०२४: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले. मात्र अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वडवण बंदराच्या कामाचे उद्घाटन झाले. अनेक विकासकामांचे उद्घाटनही केले. इथे नरेंद्र मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवरायांची माफी मागितली(Narendra Modi came to Maharashtra and apologized). मालवणच्या राजकोट किल्ल्यावर घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली. त्यांनी असं म्हटले कि “आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजपुरुष, राजा महाराज नाहीत. आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो”.
तसेच राजकोट किल्ल्यावर मागे काही दिवसांपूर्वी कोणता राजकीय राडा झाला त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.
4 thoughts on “Narendra Modi came to Maharashtra and apologized: नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये येवून माफी का मागितली?”