Majhi ladki bahin yojana fraud
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 पुरुषांचा फसवणूक प्रकरण उघडकीस
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय योजना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 12 पुरुषांचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणामुळे योजनेची प्रतिष्ठा धोक्यात आली असून, प्रशासनाने या प्रकरणी कठोर कारवाईची तयारी केली आहे.
काय आहे प्रकरण?
कन्नड तालुक्यातील या 12 पुरुषांनी महिलांचे फोटो लावून स्वत:चे अर्ज भरले होते. आधार कार्डमध्ये महिलांचा फोटो आणि नाव पुरुषाचे असे असल्याने ही फसवणूक उघडकीस आली. महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानंतर हे सर्व अर्ज रद्द करण्यात आले.
काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक राज्य शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा निश्चित १५००/- रक्कम दिली जाते.
तसेच महीला व मालमत्ता याविषयी महत्त्वाची बातमी काय आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
👉👉महीला व मालमत्ता याविषयी महत्त्वाची बातमी!👈👈
या प्रकरणाचे परिणाम
– योजनेची प्रतिष्ठा धोक्यात: या (Majhi ladki bahin yojana fraud) प्रकरणामुळे योजनेची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटनामुळे पात्र महिलांना होणारा लाभ प्रभावित होऊ शकतो.
– कठोर कारवाईची मागणी: या प्रकरणी जनतेमध्ये कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रशासनाने या प्रकरणी गुन्हे दाखल करून दोषींवर कारवाई करण्याची शक्यता आहे.
– योजनेतील सुधारणा: या (Majhi ladki bahin yojana fraud) प्रकरणानंतर योजनेतील काही सुधारणा करण्याची गरज भासू लागली आहे. अर्ज प्रक्रिया अधिक कठोर करून अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
1 thought on “Majhi ladki bahin yojana fraud: माझी लाडकी बहीण योजनेत कोणता धक्कादायक प्रकार उघडकीस!”