Sambhaji nagar Scorpio accident: दहा वर्षांनी पाळणा हलला, बारशावरुन घरी येतांना कुटुंबावर काळाचा घाला

Sambhaji nagar Scorpio accident

WhatsApp Group Join Now

14 सप्टेंबर 2024, छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भीषण स्कॉर्पियो अपघाताने सर्वत्र हळहळ उडाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मद्यधुंद चालकामुळे झाल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबेजालगावा जवळच्या नगर रोडवरील टोल नाक्याजवळ ही संपूर्ण घटना घडली आहे. एका कुटुंबातील काही व्यक्ती पुण्याला धार्मिक कार्यक्रमासाठी जात असताना मद्यधुंद चालकाच्या स्कॉर्पिओने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एक सहा महिन्याचे बाळ, त्याची आई, मोठी बहीण आणि आजीचा समावेश होता. आशालता हरिहर पोपळघट (वय ६५), अमोघ बेसरकर (६ महिने), मृणालिनी अजय बेसरकर (वय ३८), दुर्गा सागर गीते (वय ७) अशी या घटनेतील सर्व ४ मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 

अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की स्कॉर्पियो (Sambhaji nagar Scorpio accident) चालक मद्यधुंद अवस्थेत होता. तो उच्च वेगाने वाहन चालवत होता. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा भयंकर अपघात घडला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही वाहने आणि चालकाला ताब्यात घेतले.

तसेच सोमवारची शासकीय सुट्टी का रद्द झाली? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.

👉👉सोमवारची शासकीय सुट्टी का रद्द झाली? 👈👈

Leave a Comment