Nanded hadgaon ladki bahin yojana scam news: लाडक्या बहिणीचे पैसे थेट कोणाच्या खात्यात गेले?

Nanded hadgaon ladki bahin yojana scam news

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, ३० सप्टेंबर: लाडकी बहीण योजना सतत काही ना काही कारणाने चर्चेत असते. योजनेचे पैसे मिळावेत म्हणून अनेकांनी यामध्ये बरीच फेरफार करत आपला नंबर लावला आहे. अशात आता नांदेडमधून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लाडक्या बहिणीचे पैसे थेट सीएससी केंद्राच्या भावाच्या खात्यात पोहचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आधार कार्डात फेरफार करून लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या पतीच्या खात्यात जमा करण्यासाठी फॉर्म भरण्यात आला. परंतु, या रकमेचा गैरवापर करून सीएससी केंद्राच्या चालकाने ती हडपली. हा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हदगावात उघड झाला आहे.

नेमकं काय झाले? सचिन, सीएससी केंद्राचा चालक, लाडक्या बहिणींची फसवणूक करून लाखोंचा घोटाळा केला आहे. गावातील महिलांनी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज भरण्याच्या वेळी, त्याने त्यांच्या आधार क्रमांकाऐवजी त्यांच्या पतींचा आधार क्रमांक भरला. याचवेळी, त्यांचे खाते क्रमांकही दिले गेले.

योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले, परंतु सचिनने सांगितले की हे पैसे रोजगार हमी योजनेचे आहेत. त्याने सांगितले की (Nanded hadgaon ladki bahin yojana scam news) रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले आहेत. त्यानंतर, ओळखीच्या पुरुषांकडून आधार कार्ड आणि बँक पासबुक यासारखी कागदपत्रे मागवली. त्याने पुरुषांचे अंगठे घेऊन जमा झालेली सर्व रक्कम स्वतःच्या खिशात घेतली. मनाठा गावातील ३८ आणि बामणी फाटा येथील ३३ व्यक्तींचा आधार क्रमांक वापरून त्याने एकूण ३ लाख १९ हजार ५०० रुपये लंपास केले.

सचिन, सीएससी सेंटरच्या चालकाचा फसवणूक उघड कसा झाला? गावातील अलीम सलीम कादरीला मोबाइलवर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याचा संदेश मिळाला. यामुळे गावात ही बातमी पसरली आणि सेंटर चालकाचा गैरव्यवहार उघड झाला.

घटनेची (Nanded hadgaon ladki bahin yojana scam news) माहिती मिळाल्यानंतर संबंधित तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची अधिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी यावेळी आश्वासन दिले की दोषींवर योग्य कारवाई केली जाईल.

तसेच ऑक्टोबरमध्ये बँकाना जास्तीच्या किती दिवस सुट्ट्या? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 ऑक्टोबरमध्ये बँकाना जास्तीच्या किती दिवस सुट्ट्या? 👈👈

Leave a Comment