Sharad pawar party and brs party news: शरद पवारांनी खेळली सर्वात मोठी खेळी! संपूर्ण बातमी वाचा

Sharad pawar party and brs party news

मोठा पक्ष होणार शरद पवारांच्या पक्षात विलीन!

WhatsApp Group Join Now

मुंबई, ०१ आक्टोबर २४ – महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार मोठी रणनीती आखण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात असलेला बी आर एस पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात विलीन होणार आहे. येत्या ६ तारखेला पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत बी आर एसचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकारणी आणि पदाधिकारीही राष्ट्रवादी पक्षात सामील होणार आहेत, अशी माहिती बीआरएसचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक बाळासाहेब देशमुख यांनी दिली.

विधानसभा निवडणुकांचे संकेत देण्यास काहीच दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात मोठे बदल अपेक्षित आहेत. याची एक झलक ६ ऑक्टोबरला दिसून येईल, जेव्हा प्रदेश बीआरएसची कार्यकारणी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad pawar party and brs party news) पक्षात सामील होतील. हे राजकीय वर्तुळात महत्त्वपूर्ण घटनाक्रम म्हणून मानले जात आहे.

तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात बीआरएसचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी नागपूरमध्ये पक्षाचे कार्यालयही सुरू केले. तथापि, काही दिवसांतच पक्षाला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. बीआरएस तेलंगणातील एक मोठा पक्ष असला तरी, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत त्याला मोठा पराभव सामना करावा लागला.

महाराष्ट्रात के. चंद्रशेखर राव यांना मोठा (Sharad pawar party and brs party news) धक्का मिळाला आहे, कारण काही महिन्यांतच राज्यातील नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे. यामुळे बीआरएसचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. त्याउलट, विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट आहे.

तसेच महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाला निवडणूकांच्या पहीले मिळाले नवीन चिन्ह! त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाला निवडणूकांच्या पहीले मिळाले नवीन चिन्ह! 👈👈

1 thought on “Sharad pawar party and brs party news: शरद पवारांनी खेळली सर्वात मोठी खेळी! संपूर्ण बातमी वाचा”

Leave a Comment