Ladki Bahin Yojana 4th Installment date: लाडक्या बहीणींना का मिळणार १० तारखेला ३००० रुपये?

Ladki Bahin Yojana 4th Installment date

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, ०२ आक्टोबर २४: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनाबद्दल संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. शिंदे सरकारने ही योजना सुरू केली असून, महिलांना प्रत्येक महिन्यात १,५०० रुपये दिले जातात, ज्यामुळे वर्षभरात १८,००० रुपये मिळणार आहेत. सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता वितरित करण्यात आला असून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. (Ladki Bahin Yojana 4th installment date)

अजित पवारांनी बीडमधील माजलगाव येथील सभेत या बाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बहिणींना भाऊबीज म्हणून ३,००० रुपये दिले जातील. यामुळे दिवाळीच्या आधी महिलांच्या खात्यात ३,००० रुपये येण्याबाबत चर्चा सुरू आहे.

लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले की, भाऊबीजेच्या उपहास म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील ३,००० रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जातील. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात ३,००० रुपये येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana 4th Installment date)

तसेच महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाला निवडणूकांच्या पहीले मिळाले नवीन चिन्ह! त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाला निवडणूकांच्या पहीले मिळाले नवीन चिन्ह! 👈👈

7 thoughts on “Ladki Bahin Yojana 4th Installment date: लाडक्या बहीणींना का मिळणार १० तारखेला ३००० रुपये?”

Leave a Comment