Mantrimandal nirnay 4 October
महाराष्ट्र, ४ ऑक्टोबर २४: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ४) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मच्छिमार कल्याणकारी महामंडळाची घोषणा करण्यात आली, त्यासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला. तसेच, प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे (Mantrimandal nirnay 4 October) नुकसान करणाऱ्यांसाठी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्य सरकारच्या आजच्या(४ ऑक्टोबर) मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय :
– राज्यातील अकृषिक कर माफ केला जाईल.
– महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्यांसाठी अर्ज मागवले जातील.
– दौंडमध्ये बहुउद्देशीय सभागृहासाठी शासकीय जमीन उपलब्ध केली जाईल.
– त्र्यंबकेश्वर तालुक्यात किकवी प्रकल्पाच्या कामास गती दिली जाईल.
– टेंभू उपसा सिंचन योजनेला अनिल भाऊ बाबर यांचे नाव दिले जाईल.
– पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती दिली जाईल; सिल्लोडमध्ये जमिनीला सिंचन दिले जाईल.
– प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंच्या नुकसानावर आता दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाचा दंड लागू केला जाईल.
– राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकांच्या रकमेत वाढ केली जाईल.
– राज्यात आणखी १०४ आयटीआय संस्थांचे नामकरण केले जाईल.
– संत भगवान बाबांंच्या ऊसतोड कामगार अपघात विमा योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
– लहान जलविद्युत प्रकल्पांसाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण लागु होईल.
– कोकण पुणे विभागात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या स्थापिल्या जातील.
– महाराष्ट्र आरोग्य विज्ञान (Mantrimandal nirnay 4 October) विद्यापीठात सुधारित सेवांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू होईल.
– राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाईल.
– जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले जाईल.
– महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची स्थापना केली जाईल.
– आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी येथे बंदिस्त पाईपलाईन टाकण्यात येईल.
– बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट कमी केली जाईल.
– कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय स्थापन केले जाईल.
– महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन केले जाईल.
– कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव बांधले जातील.
– बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन केली जातील.
– गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना स्थायीपणे राबवली जाईल; २६०४ कोटींची मान्यता मिळेल.
– राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन केला जाईल; १ लाख ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.
– उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा केली जाईल; अधिक प्रकल्पांना प्रोत्साहन मिळेल.
– राळेगण सिद्धी येथील उपसा (Mantrimandal nirnay 4 October) सिंचन योजनेला गती दिली जाईल.
– शिरोळ तालुक्यात भूमिगत चर योजना लागू केली जाईल; बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान मिळेल.
– सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग दिले जाईल.
– वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार व्यवसायरोध भत्ता दिला जाईल.
– डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र येथील कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू होईल.
– वडाळा सॉल्ट पॅनमधील (Mantrimandal nirnay 4 October) भूखंड शैक्षणिक कारणांसाठी वापरला जाईल.
– रमाई आवास आणि शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ केली जाईल.
तसेच मंत्रालयाच्या संरक्षक जाळ्यांवर आदिवासी आमदारांनी का उड्या मारल्या? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
👉👉 मंत्रालयाच्या संरक्षक जाळ्यांवर आदिवासी आमदारांनी का उड्या मारल्या? 👈👈
4 thoughts on “Mantrimandal nirnay 4 October: आज मंत्रीमंडळाने कोणते ४१ निर्णय घेतले?”