Dipesh mhatre political party news
महाराष्ट्र, ६ आक्टोबर २४: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने अजून निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही, तरी राजकीय नेत्यांच्या पक्षांतरांची प्रक्रिया सुरू आहे. महायुतीतील काही नेते महाविकास आघाडीत सामील होत आहेत. डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत फूट पडण्याची शक्यता आहे, कारण शिंदेंच्या युवासेनेचा सचिव दीपेश म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
डोंबिवलीतील युवा सेनेचे पदाधिकारी (Dipesh mhatre political party news) दीपेश म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेला सोडून ठाकरे गटात सामील होणार आहेत. ते आपल्या सोबत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील चार माजी नगरसेवक आणि अन्य पदाधिकाऱ्यांना घेऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
आज दुपारी साडेबारा वाजता मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या समक्ष दीपेश म्हात्रेंनी प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात दीपेश म्हात्रे आणि चार माजी नगरसेवकांचा प्रवेश ठाकरे गटासाठी आनंददायी ठरेल.
शिवसेनेतील फुटीनंतर दीपेश म्हात्रे (Dipesh mhatre political party news) शिंदेंच्या गटात सामील झाले होते, आणि युवा सेना सचिव म्हणून त्यांनी तिथे काम केले. परंतु, आता विधानसभा निवडणुकीच्या आधी हा युवा नेता ठाकरे गटाकडे येत असल्याचे दिसत आहे.
तसेच बच्चु कडुंना मोठा धक्का! एकुलता एक आमदार ‘या’ पक्षात जाण्याच्या तयारीत त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
👉👉 बच्चु कडुंना मोठा धक्का! एकुलता एक आमदार ‘या’ पक्षात जाण्याच्या तयारीत 👈👈
1 thought on “Dipesh mhatre political party news: शिंदेंच्यां सेनेला मोठा धक्का! ‘या’ मोठ्या नेत्याने सोडला पक्ष”