Holidays for school in Maharashtra due to election
महाराष्ट्र, १५ नोव्हेंबर २४: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण राज्यभरात जोरात आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने प्रशासनाची तयारी चालू आहे. निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नेमणूक करण्यात आलेली आहे, ज्यामुळे 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला अनेक शाळा चालविणे शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने शाळांना (Holidays for school in Maharashtra due to election) सुट्टी देण्याबाबत एक विनंती पत्र पाठवले आहे. ज्या शाळांना शाळा चालवणे कठीण आहे, त्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या सचिवांकडून सर्व शाळांना पत्र पाठवले गेले आहे. मात्र, सुट्टी देण्याचा अंतिम निर्णय संबंधित शाळांना घ्यायचा आहे. ज्या शाळांनी सुट्टी जाहीर केली, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना 18, 19 आणि 20 नोव्हेंबरची सुट्टी मिळणार आहे, आणि 17 नोव्हेंबरला रविवार असल्याने विद्यार्थ्यांना सलग चार सुट्ट्यांचा लाभ मिळेल.
महाराष्ट्रात अनेक शिक्षक निवडणुकीच्या कर्तव्यावर असल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा 18, 19 आणि 20 नोव्हेंबर या तीन दिवशी चालवणं कठीण होत आहे. त्यातच, अनेक मतदान केंद्रं शाळांमध्येच आहेत. त्यामुळे, ज्या शाळांना या दिवशी शाळा (Holidays for school in Maharashtra due to election) चालवणं शक्य होणार नाही, त्या शाळांना सुट्टी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शिक्षण आयुक्तांनी सर्व शाळांना एक विनंती पत्र पाठवले असून, त्यात म्हटलं आहे, “18, 19 आणि 20 नोव्हेंबरला शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या शाळांना शाळा सुरू ठेवणं शक्य नसेल, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा.”
शिक्षण आयुक्तांनी विनंती पत्रात नेमकं काय नमुद केले आहे?
“वरील संदर्भानुसार, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर १८, १९ आणि २० नोव्हेंबर २०२४ रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने, विधानसभा निवडणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या शाळांना शाळा (Holidays for school in Maharashtra due to election) चालवणं शक्य होणार नाही, त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला आपल्या स्तरावर आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात, अशी विनंती शिक्षण आयुक्तांनी पत्रात केली आहे.”
तसेच आजचे राशी भविष्य (१५ नोव्हेंबर २०२४) त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
1 thought on “Holidays for school in Maharashtra due to election: शाळेत जाणाऱ्या मुलांकरीता महत्वाची बातमी! संपूर्ण माहिती बघा”