Rahul Gandhi on Narendra modi
अमरावती, १६ नोव्हेंबर २४: विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेसने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या प्रचाराला गती दिली आहे. राहुल गांधी यांनी अमरावतीत जाहीर सभा घेतली, जिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Rahul Gandhi on Narendra modi) हल्ला केला. राहुल गांधी म्हणाले की, मोदींना मेमरी लॉस झालं आहे, आणि तेही अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच स्थितीत आहेत. या सभेत त्यांनी काँग्रेस सत्तेवर आल्यावर काय कृती करणार हे स्पष्ट केले, तसेच मोदी सरकारची शेतकरी आणि सामान्य जनतेविरोधी धोरणे देखील चिमटे घेतली.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभातच नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, देशाला संविधानानुसारच चालवले पाहिजे, परंतु मोदी (Rahul Gandhi on Narendra modi) संविधानाला जिर्ण पुस्तक मानतात. बीजेपी आणि आरएसएसचे सदस्य संविधानाला एक जिर्ण दस्तऐवज मानतात, अशी टीकाही त्यांनी केली. त्याचवेळी राहुल गांधी यांनी संविधानाला देशाच्या डीएनए सारखे महत्त्व दिले आणि छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले यांचे विचार या संविधानात समाविष्ट आहेत, असेही सांगितले.
राहुल गांधी यांनी आरोप केला की, भाजपचे लोक बंद खोलीत संविधानाचा नाश करत आहेत. त्याच प्रक्रियेत त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडले, आणि यासाठी आमदारांना कोट्यवधी रुपयांमध्ये विकत घेतले. मोदी आणि शाह यांच्याच आदेशाने सरकारची चोरी झाली, असंही राहुल गांधींनी सांगितलं. ते म्हणाले की, “संविधानात असं कुठे लिहिलं आहे की सरकार पाडा आणि चोरी करा?” आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “संविधान एखादं सरकार पाडण्याची परवानगी देतं का?”
राहुल गांधींनी मोदींवर टीका करत सांगितले की, मोदी प्रत्येक सभेत हे आरोप करत आहेत की, राहुल गांधी आरक्षण विरोधी आहेत. पण त्यांना असे वाटते की मोदींची कदाचित मेमोरी लॉस (Rahul Gandhi on Narendra modi झाली आहे. राहुल म्हणाले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही असाच अनुभव आला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांना त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हटले होते, आणि नंतर त्यांना समजवून सांगितले की ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. राहुल गांधींनी याचं उदाहरण देऊन सांगितले की, मोदींची परिस्थितीही तशीच झाली आहे. याशिवाय, राहुल गांधींनी घोषणा केली की, काँग्रेस आणि इंडिया आघाडी आरक्षणावर असलेली पन्नास टक्क्याची अट रद्द करेल.
राहुल गांधींनी (Rahul Gandhi on Narendra modi) या सभेत शेतकऱ्यांना सोयाबिनसाठी सात हजार रुपये भाव देण्याचे वचन दिले. याशिवाय, कापूस आणि कांदा उत्पादकांना हमीभाव देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला 3 हजार रुपये जमा केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, जनगणना करणे त्यांच्या प्राथमिकतेत असेल, असंही त्यांनी म्हटलं. सोयाबिन उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे वचन राहुल गांधींनी या सभेत दिले.
तसेच पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती काय? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
1 thought on “Rahul Gandhi on Narendra modi: बापरे नरेंद्र मोदींना ‘हे’ झाले! राहुल गांधींनी आरोप केले..”