Manoj jarange on chagan bhujbal
येवला, १६ नोव्हेंबर २४: राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचल्यामुळे राज्यभरात प्रमुख नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. प्रचार जास्त जोर धरत असतानाच, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange on chagan bhujbal) यांनी एक नवीन डावपेच सुरू केला आहे. आज, त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या येवल्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केल्यानंतर आरक्षणाच्या लढ्याची पुनर्रचना केली जाईल.
काय म्हणाले आज मनोज जरांगे पाटील?
“ही एक सांत्वनपर भेट आहे, पण जाताना रस्त्यात जी गावं आहेत, ती बाजूला करायला हवीत का? मी कुणाला पाडायला सांगायला आलेलो नाही. पण जर मराठा समाजाला विरोध करणारे काही पाडले गेले, तर त्यात माझं काय दोष? येवल्यात काही विशेष नाही, येवला राज्याच्या बाहेर नाही. माझ्या पोटात एक आणि ओटात एक असं काही नाही. जर मी ठरवलं, तर थेट कार्यक्रम करू, हे मी स्पष्टपणे सांगतो,” असे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange on chagan bhujbal) यांनी म्हटलं.
या दौऱ्यात अंदरसुल येथील मनोज जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. या जनसमुदायाला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली. “सरकार स्थापन केल्यानंतर तारीख ठरवू. सरकार स्थापन करु द्या, मजा करु द्या. त्यानंतर मी त्यांच्यासमोर मोठा राक्षस बनून उभा राहीन. आरक्षण घ्यायचं आहे, तेच माझं मुख्य ध्येय आहे. माझं जीवन आरक्षणातच आहे. शरिरात खूप वेदना आहेत, आणि मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे,” असे त्यांनी म्हटले. जरांगे पाटील यांचे हे शब्द ऐकून जनसमुदाय स्तब्ध झाला.
तसेच बापरे नरेंद्र मोदींना ‘हे’ झाले! राहुल गांधींनी आरोप केले.. त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
👉👉 बापरे नरेंद्र मोदींना ‘हे’ झाले! राहुल गांधींनी आरोप केले.. 👈👈
1 thought on “Manoj jarange on chagan bhujbal: अखेरच्या टप्प्यात मनोज जरांगेंनी मोठा डाव टाकला! ‘यांच्या’ बालेकिल्ल्यातून केली मोठी घोषणा”