Assembly election candidate death due to heart attack: ‘या’ ठिकाणी उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाला मृत्यू

Assembly election candidate death due to heart attack

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, २० नोव्हेंबर २४: बीड विधानसभा क्षेत्रातून एक शोकात्म घटना समोर आली आहे. अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू (Assembly election candidate death due to heart attack) झाला. ते बीड विधानसभा क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढवत होते आणि बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर ते थांबले होते. अचानक त्यांना चक्कर येऊन ते पाडले. त्यानंतर त्यांना बीडमधील काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, आणि नंतर छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेमुळे बीड शहरात आणि जिल्ह्यात शोकाची लाट पसरली आहे.

राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे, मात्र दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त ४५ टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी मतदान केंद्रावर गडबड आणि तक्रारींचे व्हिडीओ समोर आले आहेत. परळीमध्ये ईव्हीएम मशीन फोडल्याच्या घटनेनंतर बीड जिल्हा चर्चेत होता, त्याचवेळी एक शोकांतिका घडली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर मृत्यू झाला. मतदान करत असताना त्यांना छातीत दुखणे आणि चक्कर येण्याचा त्रास झाला, ज्यामुळे ते जमीनावर कोसळले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत (Assembly election candidate death due to heart attack) घोषित केलं. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे.

मतदानादरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात शोक व्यक्त केला जात आहे. बीडमधील बाळासाहेब शिंदे यांचा दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मतदान केंद्रावर मृत्यू झाला. बीड मतदारसंघात या घटनेमुळे शोककळा पसरली असून, शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तसेच सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजचे भाव जाणून घ्या त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.

👉👉 सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजचे भाव जाणून घ्या 👈👈

1 thought on “Assembly election candidate death due to heart attack: ‘या’ ठिकाणी उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाला मृत्यू”

Leave a Comment