Uddhav thackeray ghat on praniti shinde: प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध ‘हा’ गट आक्रमक!

Uddhav thackeray ghat on praniti shinde

WhatsApp Group Join Now

सोलापूर, २१ नोव्हेंबर २४: सोलापूर दक्षिण मतदारसंघात मतदानाच्या दिवशी झालेल्या घटनांमुळे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात तणाव वाढला आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्यासाठी परिस्थिती बिकट झाली. यामुळे ठाकरे (Uddhav thackeray ghat on praniti shinde) गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आली असून, स्थानिक नेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांना चेतावणी दिली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरवर जोडे मारो आंदोलन देखील केले.

शरद कोळी यांनी म्हटले की, प्रणिती शिंदे गद्दार आहेत आणि त्यांनी शिवसैनिकांच्या पाठीमागे धोका दिला आहे. महाविकास आघाडीचे धोरण पाळले नाही. त्यामुळे आमच्या पक्षातील सर्व नेत्यांची मागणी आहे की, तातडीने प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी केली जावी आणि काँग्रेसने त्यांची खासदारकी रद्द केली पाहिजे. त्यांनी शिवसैनिकांच्या मदतीने खासदारकी मिळवली आहे. प्रणिती शिंदे यांना लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे (Uddhav thackeray ghat on praniti shinde) आजारी असताना या लोकांनी त्यांचं अपमान केले, आणि त्याच वेळी प्रणिती शिंदेसाठी सभा घेतल्या, यामध्ये त्यांची कोणतीही शान शिल्लक राहिली नाही. शिंदे यांनी भाजपाकडून सुपारी घेतली असून, सोलापूर दक्षिण मतदारसंघात सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांनी केला.

शरद कोळी यांनी म्हटले की, आमचा उमेदवार निवडून येणार आहे, त्यामुळे यापासून काही फरक पडत नाही, पण काँग्रेसच्या लोकांना ठेचून काढले पाहिजे. ते असे समजत आहेत की आपण सहन करत आहोत म्हणून माघार घेतोय. पण प्रणिती शिंदे, तुझ्या बापालाही आम्ही घाबरत नाही. तिने आमच्या पाठीत खंजीर घातला आहे, आणि आम्ही तिला व्याजासह उत्तर देणार. जर प्रणिती शिंदे यांच्यात सामर्थ्य असेल, तर ती सोलापूर जिल्ह्यात आणि मतदारसंघात फिरून दाखवू शकते. जिथे तिच्या गाडीची उपस्थिती असेल, तिथे आम्ही तिची गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही, असंही कोळी यांनी इशारा दिला.

नेमकं काय आहे हे प्रकरण? 

सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सार्वजनिकपणे पाठिंबा दिला. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटाने या जागेवर दावा केला होता, पण या मतदारसंघात ठाकरे (Uddhav thackeray ghat on praniti shinde) गटाच्या जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी मिळाली. सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो. काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली होती, पण एबी फॉर्म न मिळाल्याने आम्ही धर्मराज काडादी यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. ठाकरे गटाच्या नेत्यांनी या प्रक्रियेत गडबड केली, आणि एक काळ होता जेव्हा शिवसेनेचा आमदार या मतदारसंघातून निवडून आला होता, त्या आधारे ते मतदारसंघ मागत होते, पण ते चुकीचं होतं, असे सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले.

तसेच आजचे राशी भविष्य (२१ नोव्हेंबर २०२४) त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 आजचे राशी भविष्य (२१ नोव्हेंबर २०२४) 👈👈

1 thought on “Uddhav thackeray ghat on praniti shinde: प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध ‘हा’ गट आक्रमक!”

Leave a Comment