Ahmednagar rename ahilyanagar: महाराष्ट्रातील कोणत्या शहराचे आजपासून नाव बदलले?

Ahmednagar rename ahilyanagar

WhatsApp Group Join Now

मुंबई : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’ म्हणून ओळखला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी या नामांतरास मंजुरी दिली, अशी माहिती राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

अहमदनगरच्या नामांतराची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी नेत्यांनी याबद्दल वक्तव्ये केली होती. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने नामांतराची मागणी मान्य करून विधानसभेत ठराव पारित केला. त्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव पाठवला, जो आता मंजूर झाला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे अहमदनगर (Ahmednagar rename ahilyanagar) जिल्ह्यातील नागरिक आनंदी झाले आहेत. याआधी, राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण केले होते.

तसेच आज मंत्रीमंडळाने कोणते ४१ निर्णय घेतले? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 आज मंत्रीमंडळाने कोणते ४१ निर्णय घेतले? 👈👈

2 thoughts on “Ahmednagar rename ahilyanagar: महाराष्ट्रातील कोणत्या शहराचे आजपासून नाव बदलले?”

Leave a Comment