Ajit pawar seat share declared: ‘या’ बड्या नेत्याने केली अजित पवारांच्या उमेदवारीची घोषणा; महायुतीचे २३५ उमेदवारही ‘या’ दिवशी ठरणार

Ajit pawar seat share declared

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, ९ आक्टोबर २४: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे उत्साहित झालेल्या महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली यादी 12 ऑक्टोबर, म्हणजेच दसऱ्यावर जाहीर होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी (अजित गट) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच, अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याबाबतच्या चर्चांवर प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. त्यांनी स्पष्ट केले की, अजित पवार बारामतीच्या उमेदवार असतील. त्यांच्या घोषणेनंतर अजित पवार (Ajit pawar seat share declared) कोणत्या अन्य मतदारसंघातून लढतील याबाबतची चर्चा थांबली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांच्या वाटपावर महायुतीतील घटक पक्षांमध्ये अनेक मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. 235 जागांवर निवडणूक लढवण्यावर सहमती झाली असून, उर्वरित 53 जागांवर लवकरच निर्णय होईल. राष्ट्रवादीला 60 ते 65 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, आणि या जागा वाटपामुळे आम्ही समाधानी आहोत, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

हरियाणा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्रातील नेत्यांना त्यांच्या राजकीय निर्णयांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडतील. भाजपची हॅटट्रिक (Ajit pawar seat share declared) आणि जम्मू-काश्मीरमधील चांगली कामगिरी मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळाचे प्रदर्शन करते. शेतकऱ्यांचे आंदोलन, विशिष्ट जाती आणि खेळाडूंमध्ये असलेली अस्वस्थता यासारख्या मुद्द्यांवर विरोधकांनी भाजप हरवणार असल्याचे खोटे कथन माध्यमांद्वारे प्रसारित केले, असा आरोप त्यांनी केला. ‘हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निकालांनी महायुतीला ऊर्जा दिली आहे,’ असे ते (Ajit pawar seat share declared) म्हणाले आणि विरोधकांवर खोटी माहिती पसरवण्याचा आरोप केला.

तसेच ‘या’ आंदोलकांनी वर्षा बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.

👉👉 ‘या’ आंदोलकांनी वर्षा बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला 👈👈

Leave a Comment