Akole vidhansabha NCP candidate name
महाराष्ट्र, ७ आक्टोबर २४: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोले विधानसभा मतदारसंघासाठी किरण लहामटे यांचे उमेदवारी जाहीर केली. यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील दुसऱ्या उमेदवाराची घोषणा झाली आहे. किरण लहामटे सध्या अकोलेचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा अकोलेमध्ये (Akole vidhansabha NCP candidate name) पोहोचली होती. अकोले येथील सभेत अजित पवारांनी थेट उमेदवाराचे नाव जाहीर केले. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी धनुष्यबाण आणि काही ठिकाणी कमळाचे चिन्ह असणार असल्याची माहिती दिली. त्यांच्या मतदारसंघात घड्याळ चिन्ह असेल, असे सांगून अजित पवारांनी आमदार किरण लहामटे यांची अकोले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.
काय बोलले उपमुख्यमंत्री अजित पवार?
अजित पवार यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांमध्ये त्यांना फक्त तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या तीन वर्षांत आमदारांनी त्यांच्या पाठिशी राहून अकोले तालुक्यासाठी मोठा निधी मिळवला. जर त्यांना पहिले दोन वर्ष मिळाले असते, तर अधिक कामे करणे शक्य झाले असते. तिजोरीच्या स्थितीचा विचार करूनच त्यांना कामे करावी लागतात.
तसेच शिंदेंच्यां सेनेला मोठा धक्का! ‘या’ मोठ्या नेत्याने सोडला पक्ष त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
👉👉 शिंदेंच्यां सेनेला मोठा धक्का! ‘या’ मोठ्या नेत्याने सोडला पक्ष 👈👈
2 thoughts on “Akole vidhansabha NCP candidate name: अजीत पवारांनी विधानसभेसाठी ‘या’ उमेदवाराचे नाव जाहीर केले”