Amravati cars accident news
अमरावती, २ डिसेंबर २४: दोन कार एकमेकांना समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात अमरावती (Amravati cars accident news) जिल्ह्यातील दर्यापूर-अकोला मार्गावर घडला. जखमींना उपचारासाठी अकोल्याला पाठवण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतांमध्ये आनंद बाहकर (26), बंटी बिजवे (38) आणि प्रतीक बोचे (35) यांचा समावेश आहे. याशिवाय, पप्पू घाणीवाले हे जखमी झाले असून, दुसऱ्या कारमधील आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल हे जखमी झाले आहेत.
प्रतीक, आनंद, बंटी आणि पप्पू हे MH 27 डीई 6260 या क्रमांकाच्या कारने अकोल्याकडे जात होते, तर आकाश अग्रवाल यांची कार MH 29 बीसी 7786 त्यांच्याकडे येत होती. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दोन्ही कार एकमेकांना जोरदार धडकल्या. या भीषण अपघातात प्रतीक बोचे आणि बंटी बिजवे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आनंद बाहकर यांना दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. जखमी अग्रवाल पिता-पुत्रांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहे.
तसेच शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का! ‘हे’ नेते सोडु शकतात सोबत त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
👉👉 शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का! ‘हे’ नेते सोडु शकतात सोबत 👈👈
1 thought on “Amravati cars accident news: बापरे ‘या’ ठिकाणी भीषण अपघात! ३ लोकांनी गमावले प्राण”