Buldhana hair fall news
बुलढाणा, ९ जानेवारी २५: देशभरात एचएमपीव्ही या व्हायरसने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असतानाच, बुलढाणा (Buldhana hair fall news) जिल्ह्यात एका अनोख्या आजाराने लोकांची चिंता वाढवली आहे. शेगाव परिसरातील काही ग्रामस्थ अचानकपणे टकले होत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळू लागल्याने गावातील अनेक जण टकले दिसत आहेत. ही समस्या केवळ पुरुषांमध्येच नाही, तर महिलांमध्येही दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार भानामतीचा आहे की एखाद्या नव्या व्हायरसचा परिणाम, याबाबत गावात चर्चेला उधाण आले आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घटनांमागचे कारणही समोर आले आहे.
बुलढाणा (Buldhana hair fall news) जिल्ह्यातील केस गळतीच्या या घटनेबाबत महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि खातखेड गावातील पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तसेच, या पाण्याची टीडीएस पातळी खूपच वाढल्याचे तपासणीत उघड झाले आहे. या विषारी पाण्याचा वापर गावकऱ्यांसाठी हानिकारक ठरत असून त्यामुळेच केस गळतीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे समजते. या खारपाण पट्ट्यात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय करण्यात आली आहे, परंतु वापराच्या पाण्यात नायट्रेट मोठ्या प्रमाणात असल्याने तेही अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शेगाव तालुक्यात टक्कल पडणाऱ्या रुग्णांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे. अवघ्या तीन दिवसांत आलेल्या प्रचंड तक्रारींनंतर आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही या गावात दाखल झाले असून कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावांत तपासणी सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, ही समस्या फंगल इन्फेक्शनमुळे झाली असण्याची शक्यता आहे आणि हा आजार दूषित पाण्यामुळे होतो, असे प्रथमदर्शनी आढळले आहे. पाणी व त्वचेसंबंधित नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणीनंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
तसेच बापरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘या’ ठिकाणी काँग्रेसला दिला मोठा धक्का त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि बघा.
👉👉 बापरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘या’ ठिकाणी काँग्रेसला दिला मोठा धक्का 👈👈