Chaitanya maharaj arrest news: चैतन्य महाराजांना का झाली अटक?

Chaitanya maharaj arrest news

WhatsApp Group Join Now

पिंपरी -चिंचवड: प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेले चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज) यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चैतन्य महाराज आणि त्यांच्या दोन भावांनी व नातेवाईकांनी बेकायदेशीरपणे पोकलेनने एक रस्ता खोदल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणात चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज), अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना मध्यरात्री अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, चैतन्य महाराज (Chaitanya maharaj arrest news) वाडेकर म्हाळुंगे परिसरात राहतात, जिथे त्यांच्या घराजवळ एक कंपनी आहे. त्या कंपनीच्या रस्त्यावरून त्यांचे वाद सुरू आहेत. बुधवारी रात्री, त्यांनी बेकायदेशीरपणे त्या रस्त्याचे खोदकाम केले, त्यावेळी त्यांच्यासोबत एक नातेवाईक आणि दोन भाऊ होते. कंपनीच्या कंपाउंडच्या भिंतीदेखील तोडल्या आहेत. यावरून कंपनीच्या व्यवस्थापक अजित पाटील यांनी म्हाळुंगे पोलिसांत तक्रार केली, ज्यामुळे चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली. चैतन्य महाराज वाडेकर सोशल मीडियावर सक्रिय असून, त्यांचे लाखो चाहते आहेत, आणि त्यांच्या अटकेमुळे त्यांचे चाहते चकित झाले आहेत.

तसेच लाडक्या बहीणींना का मिळणार १० तारखेला ३००० रुपये? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 लाडक्या बहीणींना का मिळणार १० तारखेला ३००० रुपये? 👈👈

1 thought on “Chaitanya maharaj arrest news: चैतन्य महाराजांना का झाली अटक?”

Leave a Comment