Chatrapati sambhaji raje political party: महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाला निवडणूकांच्या पहीले मिळाले नवीन चिन्ह!

Chatrapati sambhaji raje political party

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, ०१ आक्टोबर २४: कोल्हापूरच्या छत्रपती संभजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाने ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता दिली आहे. या पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक चिन्ह म्हणून त्यांना सप्त किरणांसह पेनाची निब मिळाली आहे. संभाजीराजेंनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचवली आहे.

छत्रपती संभजीराजेंनी (Chatrapati sambhaji raje political party) आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी सर्वांना कळवली. त्यांनी लिहिले की, “आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते, हितचिंतक आणि महाराष्ट्रवासीयांना कळवताना मला अत्यंत आनंद होतो की, ९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि अनेक शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीने स्थापन झालेली ‘स्वराज्य संघटना’ आता भारतीय निवडणूक आयोगाकडे ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झाली आहे. त्यामुळे, स्वराज्य संघटना आजपासून ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून ओळखली जाईल.”

तसेच, “आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष याला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. मागील वर्षभरात आपण संघटनेला एक पक्ष म्हणून सर्वत्र पोहोचवले आहे, त्यामुळे आता हे चिन्ह सर्व मतदारांपर्यंत पोचवणे आमचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचा आपल्यावर असलेला प्रेम, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न आणि राज्यातील राजकारणात एक नवीन, सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता, हे (Chatrapati sambhaji raje political party) सर्व मिळून आगामी निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करेल आणि परिवर्तन महाशक्तीला सत्तेत आणेल, हे निश्चित आहे! जय स्वराज्य!” असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच काल मंत्रिमंडळाने कोणते ३८ निर्णय घेतले? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 मंत्रिमंडळाने कोणते ३८ निर्णय घेतले? 👈👈

3 thoughts on “Chatrapati sambhaji raje political party: महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाला निवडणूकांच्या पहीले मिळाले नवीन चिन्ह!”

Leave a Comment