Dhangar reservation protestors at varsha residence: ‘या’ आंदोलकांनी वर्षा बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला

Dhangar reservation protestors at varsha residence

WhatsApp Group Join Now

मुंबई, ८ आक्टोबर २४: धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र होत आहे. मंगळवारी आंदोलकांनी मंत्रालयाच्या जाळ्यांवर चढाई केल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्याबाहेर आंदोलन केले. यावेळी धनगर बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आणि सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. आंदोलकांनी धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ जीआर जारी करण्याची मागणी केली.

वर्षा निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या धनगर बांधवांना (Dhangar reservation protestors at varsha residence) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे वर्षा निवासस्थानी जात आहेत. धनगर आरक्षणासंदर्भात सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, धनगर समाज दुपारी आरक्षणाच्या मागणीवर आक्रमक झाला. काही कार्यकर्ते मंत्रालयात आले आणि त्यांनी थेट सुरक्षा जाळ्यावर उड्या मारल्या, तसेच जोरदार आंदोलन सुरू केले. यामुळे गोंधळ निर्माण झाला.

यावेळी पोलिसांनी धावपळ (Dhangar reservation protestors at varsha residence) करून आंदोलकांना जाळीवरून काढले. मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर आंदोलकांना पाहण्यासाठी गर्दी जमा झाली. त्यानंतर आंदोलकांनी आपल्या आरक्षणासंबंधीच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.

तसेच अजीत पवारांनी विधानसभेसाठी ‘या’ उमेदवाराचे नाव जाहीर केले त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 अजीत पवारांनी विधानसभेसाठी ‘या’ उमेदवाराचे नाव जाहीर केले 👈👈

1 thought on “Dhangar reservation protestors at varsha residence: ‘या’ आंदोलकांनी वर्षा बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला”

Leave a Comment