Eknath shinde health news
महाराष्ट्र, ३ डिसेंबर २४: एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाल्याने आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांनी ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात उपचार घेतले.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde health news) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावलेली आहे. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ते आज तपासणीसाठी ज्यूपिटर रुग्णालयात दाखल झाले. येथे त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.
मागील आठवड्यात साताऱ्यातील दरे गावी असताना त्यांना १०५ डिग्री ताप आला होता, ज्यासाठी स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते मुंबईला परतले, पण प्रकृतीत फारसा बदल झाला नाही. आता त्यांना घशाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.
ज्यूपिटर रुग्णालयात तपासणी दरम्यान, त्यांच्या पत्नी लता शिंदे (Eknath shinde health news) देखील उपस्थित होत्या. जवळपास तासभर चाललेल्या तपासणीनंतर शिंदे रुग्णालयातून बाहेर पडले.
माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, “तब्येत ठीक आहे. चेकअपसाठी आलो होतो. आता तब्येत उत्तम आहे.” त्यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे काही नेतेही होते.
दरम्यान, ६ डिसेंबर रोजी कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून, ५ तारखेला शपथविधी सोहळा होणार आहे.
यावेळी मंत्रिपद वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीचे वातावरण असून, दोन्ही पक्ष गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत. मात्र, एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम असल्याचे समजते. तरीही त्यांनी पीएम मोदींच्या निर्णयाला आपली मान्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज! त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
👉👉 फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज! 👈👈
1 thought on “Eknath shinde health news: एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातुन बाहेर येताच काय दिली प्रतिक्रिया!”