Family holds burial event for old car
भारत, ९ नोव्हेंबर २४: गुजरातमधील अमरिल जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाने त्यांच्या १५ वर्षे जुनी ‘लकी’ कार विकण्याऐवजी ती आपल्या शेतात आणून पुरली. या अनोख्या प्रसंगी संपूर्ण गाव सहभागी झाले होते आणि विधिपूर्वक पूजा केली.
अमरेली जिल्ह्यातील लाठी तालुक्यातील पडरशिंगा गावात गुरुवारी संजय पोलारा आणि त्यांच्या कुटुंबाने आपली लकी कार शेतात पुरली. या प्रसंगी भव्य समारंभ आयोजित करण्यात आला, ज्यात संत, आध्यात्मिक नेत्यांसह १५०० हून अधिक लोक उपस्थित होते. या घटनेने राज्यभर चांगलीच चर्चा निर्माण केली.
ज्याठिकाणी कुटुंबाची लकी कार (Family holds burial event for old car) पुरली, तिथे एक ठळक चिन्ह लावण्यात आले आहे, जेणेकरून ही घटना आगामी पिढ्यांना लक्षात राहील, असे कुटुंबाचे म्हणणे आहे. या भव्य समारंभाचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत, ज्यात पोलारा आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या शेतात कार पुरण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात मंत्रोच्चार करताना दिसत आहेत. या कारला फुलांनी आणि हारांनी सजवले होते.
पोलारा कुटुंबाने कार जमिनीत पुरण्यासाठी आपल्या शेतात सुमारे १५ फूट खोल खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यात गाडी सहज पोहोचवता येईल, अशी उताराची व्यवस्था केली. नंतर, गाडी त्या उतारावरून खड्ड्यात नेली गेली, आणि तिच्यावर हिरव्या रंगाची चादर घालून कुटुंबाने तिची पूजा केली. त्यानंतर, त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. या वेळी उपस्थित पुजारी मंत्रोच्चार करत होते. शेवटी, जेसीबीच्या मदतीने कारवर माती टाकून तिला कायमचा पुरण्यात आले. पोलारा कुटुंबासाठी लकी मानली जाणारी ही वॅगनआर कार (Family holds burial event for old car) जीजे ०५-सीडी ७९२४ नंबरची होती.
संजय पोलारा, जे सुरतमध्ये बांधकाम व्यवसाय करतात, यांनी त्यांच्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरलेल्या कारच्या आठवणी भावी पिढ्यांना कायम राहाव्यात, म्हणून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा व्यक्त केली. पत्रकारांशी बोलताना पोलारा म्हणाले, “मी ही कार (Family holds burial event for old car) १५ वर्षांपूर्वी विकत घेतली आणि तिच्या आगमनाने कुटुंबात समृद्धी आली. व्यवसायात यश मिळाल्यामुळे माझ्या कुटुंबाला मान-सन्मानही मिळाला. ही कार माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरली, त्यामुळे ती विकण्याऐवजी मी तिला शेतात पुरून तिच्या आठवणी जपल्या.” या समारंभासाठी त्यांना एकूण चार लाख रुपये खर्च आले, असे त्यांनी सांगितले.
संत आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत हिंदू रीतीरिवाजानुसार समाधी सोहळा आयोजित करण्यात आला, ज्यासाठी सुमारे दीड हजार लोकांना आमंत्रित केले गेले होते आणि त्यासोबत मेजवानीचं आयोजन देखील करण्यात आले, अशी माहिती पोलारा यांनी दिली.
तसेच आजचा पेट्रोल-डिझेलचा दर (९ नोव्हेंबर २४) काय आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
2 thoughts on “Family holds burial event for old car: बापरे! ढोल- ताशांच्या गजरात जुन्या कारवर अंत्यसंस्कार; जाणून घ्या त्यामागचे कारण!”