Farmers anudhan todays news: आज कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले?

Farmers anudhan todays news

WhatsApp Group Join Now

मुंबई, ३० सप्टेंबर २४: आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, २०२३ च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा केले जाणार आहे.

कापूस आणि (Farmers anudhan todays news) सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याची मर्यादा दोन हेक्टर आहे.

पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यात २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा केले जात आहेत. राज्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ९६ लाख ७८७ आहे.

त्यापैकी ६८ लाख ६ हजार ९२२ खात्यांची माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे. यामध्ये नमो शेतकरी महासन्मानच्या माहितीबरोबर आधार जुळणी आणि ७० टक्के पर्यंत नावाची पडताळणी केलेल्या खात्यांची संख्या ४१ लाख ५० हजार ६९६ आहे. आधार जुळणी आणि ६९ टक्के माहितीची पडताळणी केलेल्या खात्यांची संख्या ४ लाख ६० हजार ७३० आहे. तसेच, आधारसंमतीपत्रानुसार माहिती भरलेल्या खात्यांची संख्या १७ लाख ५३ हजार १३० आहे.

या पद्धतीने ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या ६३ लाख ६४ हजार खात्यात अनुदानाची आर्थिक मदत जमा केली जाणार आहे, ज्यासाठी २ हजार ३९८ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद आवश्यक आहे.

तसेच आज मंत्रिमंडळाने कोणते ३८ निर्णय घेतले? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 आज मंत्रिमंडळाने कोणते ३८ निर्णय घेतले? 👈👈

Leave a Comment