Fengal cyclone affect on Maharashtra: फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज!

Fengal cyclone affect on Maharashtra

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, ३ डिसेंबर २४: फेंगल चक्रीवादळामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळानंतर कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात असून कोकणासाठीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 आणि 4 डिसेंबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच, 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे.

चक्रीवादळाचा (Fengal cyclone affect on Maharashtra) धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजूनही हवामानावर दिसत आहेत. थंडीच्या काळात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या हलक्या सरी कोसळतील, तर 3 आणि 4 डिसेंबरला पावसाचा जोर वाढेल. विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 5 डिसेंबरनंतर पावसाचा जोर कमी होईल, असे सांगण्यात आले आहे.

चंद्रपुरातील शेतीवर फेंगलचा परिणाम 

फेंगल चक्रीवादळामुळे (Fengal cyclone affect on Maharashtra) चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. रविवारी ढगाळ वातावरणासह काही भागात रिपरिप पाऊस पडल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. कापूस आणि हरभरा पिकांवर परिणाम झाला असून तुळस पिकाला फुलोरा आल्यानंतर त्यावर गळतीचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तसेच ‘या’ ठिकाणी चालू होते बॅलेट पेपरवर मतदान पण पोलिसांनी येऊन थांबवलं! कारण काय? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 ‘या’ ठिकाणी चालू होते बॅलेट पेपरवर मतदान पण पोलिसांनी येऊन थांबवलं! कारण काय? 👈👈

1 thought on “Fengal cyclone affect on Maharashtra: फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज!”

Leave a Comment