First candidate for assembly elections: विधानसभेसाठी महायुतीचा पहीला उमेदवार जाहीर!

First candidate for assembly elections

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, ३० सप्टेंबर २४: लोकसभेनंतर सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सामना होईल. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता, दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांना किती जागा मिळतील याबाबत उत्सुकता आहे. जागा वाटपावर चर्चा सुरू आहे, आणि लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महायुतीचा पहिला उमेदवार निश्चित झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवर राष्ट्रवादीच्या पहिल्या (First candidate for assembly elections) उमेदवाराची घोषणा केली, ज्याचा संबंध फलटण विधानसभा मतदारसंघाशी आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत. तरीही, त्यांनी फोनवरून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा उमेदवार म्हणून घोषित केले.

दीपक चव्हाण यांच्या (First candidate for assembly elections) उमेदवारीच्या घोषणेमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणात अजित पवारांनी थेट फोनद्वारे दीपक चव्हाण यांना उमेदवार म्हणून जाहीर केले, त्यामुळे चर्चांना एक नवीन गती मिळाली आहे.

तसेच धर्मवीर चित्रपटाबद्दल काय म्हणाले नितेश राणे? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 धर्मवीर चित्रपटाबद्दल काय म्हणाले नितेश राणे? 👈👈

Leave a Comment