Girish Mahajan jamner news
जळगाव । १६ सप्टेंबर २०२४ : येत्या २-३ महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच राज्यात भाजपचे व महायुतीचे काही नेते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत असल्याचं दिसत आहे. अशातच आता जळगावमध्ये भाजपला (Girish Mahajan jamner news) खुप मोठा धक्का बसला आहे. उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच मराठा समाजातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून मानले जाणारे नेते दिलीप खोडपे यांनी भाजपच्या त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला (Girish Mahajan jamner news) असून ते लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजेच शरद पवार यांच्या गटात प्रवेश केल्यावर त्यांना विधानसभचे तिकीट मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिलीप खोडपे हे गिरीष महाजन यांच्याविरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ना. गिरीश महाजन यांच्या उत्तर महाराष्ट्रातील जामनेर मतदारसंघात त्यांना कुणाचेही आव्हान नसल्याचे चित्र होते. कारण काही महिन्यांपूर्वी महाजन यांचे कट्टर विरोधक असणारे संजयदादा गरूड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महाजन यांचा एकतर्फी विजय होईल असे सर्वांचे मत होते. मात्र आता संकटमोचन म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांचे संकट वाढतांना दिसत आहे.
तसेच कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केली राजीनाम्याची घोषणा? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.
👉👉 कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केली राजीनाम्याची घोषणा? 👈👈
कोण आहेत दिलीप खोडपे?
दरम्यान, दिलीप खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख आहे तसेच हे जळगावमधील भारतीय जनता पक्षाचे बडे नेते मानले जातात. ते जळगाव जिल्हा परिषदेचे माजी आहेत.
2 thoughts on “Girish Mahajan jamner news: महायुतीचे संकटमोचक संकटात येण्याची शक्यता!”