Haryana Assembly Election Result 2024
भारत, ८ आक्टोबर २४: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेस मागे आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, पण प्रत्यक्षात त्याचं उलट चित्र दिसत आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल (Haryana Assembly Election Result 2024) आज सकाळी ८ वाजेपासून प्रसिद्ध होत आहेत. प्रारंभात काँग्रेसने आघाडी घेतली, पण काही तासांत भाजपने जोरदार प्रगती केली आणि आघाडीवर येण्यास यश मिळवले. ९० जागांवरच्या कलांनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, तो ४८ जागांवर पुढे आहे, तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे भाजप सत्तेची हॅट्रीक साधण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
यावरून असे लक्षात येते की हरियाणामध्ये भाजप बहुमताने सत्ता स्थापन करू शकतो. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना यावेळी फायदा झाला आहे. भाजप सुरूवातीला ४० जागांवर होता, तर आता ४८ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने ३१ जागांवरून ३६ जागांवर वाढ केली आहे. यावेळी जननायक जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून, १० जागांवर असलेली जेजेपी यंदा एकही जागा जिंकू शकलेली नाही.
तसेच ‘या’ ५० जागा जिंकण्याचे शरद पवारांचे लक्ष! आखली मोठी रणनिती त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
👉👉 ‘या’ ५० जागा जिंकण्याचे शरद पवारांचे लक्ष! आखली मोठी रणनिती 👈👈