Jogeshwari high voltage drama between thackeray and shinde: ‘या’ ठिकाणी दोन गटात मोठा वाद!

Jogeshwari high voltage drama between thackeray and shinde

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, १३ नोव्हेंबर २४: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे. या प्रचाराच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोप होत असतानाच मुंबईत एक मोठा वाद घडला आहे. मंगळवारी रात्री जोगेश्वरीत (Jogeshwari high voltage drama between thackeray and shinde) प्रचाराच्या वेळी शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना जोरदार मारहाण केली, ज्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला.

नेमके काय आहे हे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत महिलांना काही वस्तूंचे वाटप करत होते, हे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लबवर पोहचले आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना याबद्दल प्रश्न विचारले.

यावेळी दोन्ही गटातील शिवसैनिक आपापसात भिडले आणि एकमेकांना मारहाण केल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा पथक आणि दंगलविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्वरित परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मातोश्री क्लबबाहेर जमा झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाने मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याचा आरोप केला.

कोणत्या गटाचे नेते घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार बाळा नर घटनास्थळी पोहोचले. ते गोंधळाच्या वेळी शिवसैनिकांबरोबर पुढे होते. मातोश्री क्लबवर वायकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण सुरू केल्याचा आरोप करत त्यांनी कारवाईची मागणी केली. त्याच वेळी अनिल परब देखील घटनास्थळी उपस्थित झाले. शिंदे गटावर जबाबदारी ठरवत, त्यांनी शिंदे गट पैसे आणि धान्य वाटप करून आचारसंहितेचा उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार (Jogeshwari high voltage drama between thackeray and shinde) करण्याची माहिती परब यांनी दिली.

तसेच आजचे राशीभविष्य (१३ नोव्हेंबर २०२४) त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.

👉👉 आजचे राशीभविष्य (१३ नोव्हेंबर २०२४) 👈👈

1 thought on “Jogeshwari high voltage drama between thackeray and shinde: ‘या’ ठिकाणी दोन गटात मोठा वाद!”

Leave a Comment