Kalyan jijavu party candidate
मुंबई, १८ नोव्हेंबर २४: कल्याण पश्चिमेतील प्रचार रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यानं एका उमेदवाराला जीवाचा धोका निर्माण झाला. यामुळे त्या उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळण्याची धक्कादायक घटना घडली.
राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे राजकीय प्रचार चांगलाच तापला आहे. आज प्रचाराचा अंतिम दिवस असून, निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय नेत्यांची धडपड सुरू आहे. त्याच दरम्यान, कल्याणमधून (Kalyan jijavu party candidate) एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. कल्याण पश्चिमेत प्रचार रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याने एका उमेदवाराचा जीव धोक्यात आला. यामुळे त्या उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळण्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कल्याण पश्चिममधील जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा प्रचार करत असताना, भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी एक भव्य दीडशे किलो वजनाचा हार तयार करण्यात आला होता. हा हार क्रेनच्या मदतीने त्यांच्यावर घालण्यात आला, आणि त्यासोबत फटाके लावले होते. अचानक या फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्यावर पडली, ज्यामुळे त्यांचे केस जळले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, पण हा प्रकार खूपच धक्कादायक होता.
तसेच सोनं-चांदीच्या किंमतीत आज महाराष्ट्रात काय बदल झाला? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
1 thought on “Kalyan jijavu party candidate: बापरे फटाके वाजवणं एका उमेदवारांच्या जीवाशी बेतलं!”