Laxman hake announces defeat 50 candidates
नागपूर ०१ आक्टोबर २४: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत, तर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होत आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक असून, ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढत आहेत. जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडण्याची घोषणा केली आहे, तर हाके यांनी 50 उमेदवार पाडणार असल्याचे सांगितले आहे. या 50 उमेदवारांची यादी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
लक्ष्मण हाके यांनी (Laxman hake announces defeat 50 candidates) आरोप केला आहे की राज्यकर्त्यांनी ओबीसी नेत्यांना सदैव दुय्यम वागणूक दिली आहे. ज्याच्यातील तरुण ओबीसी नेत्यांना महामंडळ किंवा विधान परिषद दिली जात आहे, त्यांना शांत करण्याचे उदाहरणे आहेत. परंतु प्रस्थापित नेत्यांना भिती बाळगण्याची आवश्यकता नाही, तर पन्नास ते साठ टक्के समाजाच्या भीतीने शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना जागरूक व्हावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. ही भीती आगामी विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.
ओबीसी समाज 50 उमेदवारांना पाडणार आहे, आणि कोणाला पाडायचे हे आधीच ठरले आहे. त्यांच्या नावांची आणि मतदार संघांची यादीही तयार झाली आहे, असे हाके यांनी स्पष्ट केले. जरांगेला समर्थन दिलेल्या आणि आर्थिक मदत केलेल्या सर्वांना या निवडणुकीत पाडले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यादीत राजेश टोपे, रोहित पवार आणि रोहित पाटील यांची थेट नावे आहेत, असे हाके यांनी सांगितले.
“आम्ही सांगितलेले उमेदवार द्या, त्यांना आम्ही निवडून आणू,” असे हाके यांनी म्हटले. त्यांनी ओबीसींची भूमिका मांडणारे 50 प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्याचा उल्लेखही केला. यावेळी, संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तिसऱ्या आघाडीवर त्यांनी टीका केली. मनोज जरांगे आणि संभाजी राजे मराठा तरुणांना भडकवत असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच ओबीसींनी आरक्षण मिळवल्यामुळे मराठ्यांचे नुकसान झाले, हे चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या मराठा नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरवण्याची स्पर्धा सुरू आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. मनोज जरांगे पाटील, शरद पवार, आणि एकनाथ शिंदे यांचा यामध्ये आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. हाके यांनी ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट केली आहे, परंतु त्यांना किती समर्थन मिळते, हे महत्वाचे ठरेल. लोकसभा (Laxman hake announces defeat 50 candidates) निवडणुकीत मराठा घटक प्रभावी ठरला होता; आता विधानसभेत मराठा की ओबीसी घटक प्रभावी राहील, हे पाहावे लागेल.
तसेच शरद पवारांनी खेळली सर्वात मोठी खेळी! त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.