Mahavikas aghadi manifestos 5 important point: बापरे महाविकास आघाडी देणार ‘या’ लोकांना येवढे पैसे!

Mahavikas aghadi manifestos 5 important point

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, १० नोव्हेंबर २४: महाविकास आघाडीने रविवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यात त्यांनी १०० दिवसांचा कार्ययोजना जाहीर केली. त्यामध्ये पदवीधर आणि पदविका धारक बेरोजगार तरुणांना दरमहा ४,००० रुपये देण्याचे वचन दिले आहे. जाहीरनाम्यात महाराष्ट्रात नवीन औद्योगिक धोरण तयार करण्याचीही घोषणा (Mahavikas aghadi manifestos 5 important point) करण्यात आली आहे.

आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आमदार नाना पटोले, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, त्यांच्या पाच हमी योजनांनी महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका (Mahavikas aghadi manifestos 5 important point) बजावली आहे. प्रत्येक कुटुंबाला अंदाजे ३ लाख रुपयांची वार्षिक मदत मिळणार असून, महालक्ष्मी योजनेअंतर्गत सर्व महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाईल. योजनेच्या भाग म्हणून महिलांना दरमहा ३ हजार रुपये दिले जाणार आहेत आणि तसेच महाराष्ट्रातील महिलांसाठी मोफत बससेवा सुरू केली जाईल.

महाविकास आघाडीच्या काय आहेत पाच गॅरेंटी  

1. महालक्ष्मी योजना महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे वचन, तसेच महिलांसाठी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा.

2. समानतेच्या प्रोत्साहनार्थ जातिनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन, तसेच ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्याचा निर्णय.

3. कौटुंबिक संरक्षण अंतर्गत २५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याची हमी, तसेच मोफत औषधांची सुविधा.

4. कृषी समृद्धी साठी शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे वचन, तसेच नियमित कर्ज परतफेडीवर ५०,००० रुपयांचे प्रोत्साहन.

5. बेरोजगार तरुणांना दरमहा ४,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा केली? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी‌ काल चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा केली? 👈👈

Leave a Comment