Makoka for santosh Deshmukh death case
बीड, ११ जानेवारी २५: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सात आरोपींपैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल असून, पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संघटित गुन्हेगारीतील सहभाग लक्षात घेता, त्यांच्यावर मकोकाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
सरपंच (Makoka for santosh Deshmukh death case) हत्याकांडावरून कारवाईची मागणी होत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत निवेदन सादर केले होते. त्यांनी आश्वासन दिले होते की कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही आणि आवश्यक असल्यास मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
खंडणीच्या प्रकरणात मकोका कारवाईचे मागणी
पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेषतः विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे सरपंच हत्येच्या प्रकरणातही आरोपी असल्याने, खंडणी आणि हत्येच्या प्रकरणात परस्पर संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे वाल्मीक कराड याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
आरोपींची न्यायालयीन कोठडी
सीआयडी कोठडीत असलेल्या विष्णू चाटेला केज न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे मुख्य न्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांनी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर वाल्मीक कराड १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत राहणार आहे. सरपंच हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबात विष्णू चाटेला सहआरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे.
खंडणी प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया
आरोपी विष्णू चाटेला न्यायालयाने १९ दिवस पोलिस कोठडीत ठेवले होते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता त्याला पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात आले. सीआयडी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यानंतर मुख्य न्यायाधीशांनी त्याला कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
तसेच महाविकास आघाडी फुटली! संजय राऊत यांच्या ‘या’ वक्तव्याने असंच वाटतय त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
👉👉 महाविकास आघाडी फुटली! संजय राऊत यांच्या ‘या’ वक्तव्याने असंच वाटतय 👈👈
1 thought on “Makoka for santosh Deshmukh death case: मोठी बातमी! संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘हा’ गुन्हा दाखल”