Manoj Jarange on Kalicharan Maharaj: मनोज जरांगे पाटील यांनी अक्षरश: ‘या’ व्यक्तीला झोडपून काढलं

Manoj Jarange on Kalicharan Maharaj

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, १९ नोव्हेंबर २४: मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे हिंदू समाजात फूट पडल्याचं म्हणणारे कालीचरण महाराज यांना आरक्षण आंदोलनाचे नेता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange on Kalicharan Maharaj) यांनी चांगलंच फटकारलं आहे. “आंतरवाली सराटीत आमच्या आयाबहिणींवर लाठीहल्ला झाला, तेव्हा हा कुठं होता? त्या आयाबहिणी हिंदू नव्हत्या का?” असा कठोर प्रश्न जरांगे यांनी विचारला आहे.

कालीचरण बाबांनी अलीकडील एका कार्यक्रमात मनोज जरांगे यांची राक्षसाशी तुलना केली होती आणि ते म्हणाले होते की हा माणूस हिंदू समाजात फूट घालतो आहे. या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

“ह्या बाबांना या विषयावर बोलण्याची काही गरज नव्हती. आम्ही संत-महंतांना मानणारे लोक आहोत, पण आरक्षणाशी त्यांचा काय संबंध? ह्या लोकांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार दिले पाहिजेत आणि एकजूट राहण्याचे आवाहन केलं पाहिजे. महाराजांचं काम असं असतं, आरक्षणावर बोलणं त्यांचं काम नाही. पण हा कोण बाबा आला? काहीतरी विचित्र प्राणी आहे. ह्याला काय काम आहे? मी कधी त्याला काही बोललो होतो का? हा कुठून टिकली लावतो? पुढे लावतो का मागे लावतो? आम्ही कधी काही बोललो होतो का? मी त्याला ओळखतही नाही,” असं जरांगे पाटील यांनी म्हटलं.

“हिंदुत्वाची शिकवण ह्यानं आम्हाला देण्याची आवश्यकता नाही. आंतरवाली सराटीत आमच्या आयाबहिणींवर हल्ला झाला तेव्हा हा टिकली कुठे होता? त्या आयाबहिणी हिंदू नव्हत्या का? आमच्या पोरांनी फाशी घेतली तेव्हा हा कुठे होता? ते हिंदू नव्हते का? हे बेअकलीसारखं बोलतो, टिकल्या लावतो, नथ घालतो. वर काही वेगळं दिसतो, खाली काही वेगळं दिसतो. मराठे हिंदू नाहीत का? हिंदू समाजात अर्धा मराठा आहे. धर्मावर संकट आलं की आमच्यासारखे गरीब हिंदूच रक्षण करतात. मराठे, ओबीसी आणि अठरापगड जातीच वार सहन करतात. तुमच्यासारखे कुलप लावून एसीत बसतात,” असं जरांगे पाटील (Manoj Jarange on Kalicharan Maharaj) यांनी कडक भाषेत उत्तर दिलं.

तसेच विनोद तावडे यांनी तब्बल ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप… त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 विनोद तावडे यांनी तब्बल ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप… 👈👈

1 thought on “Manoj Jarange on Kalicharan Maharaj: मनोज जरांगे पाटील यांनी अक्षरश: ‘या’ व्यक्तीला झोडपून काढलं”

Leave a Comment