Mantrimandal nirnay 30 September
महाराष्ट्र ३० सप्टेंबर २४: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय (Mantrimandal nirnay 30 September) घेण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची उपस्थिती होती.
मंत्रिमंडळाचे निर्णय:
– कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरण लागू.
– ग्राम रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान.
– ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाची कामे गती मिळतील, एमएमआरडीएला कर्ज सहाय्य.
– ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला गती, 12,200 कोटींचा सुधारित आराखडा मान्य.
– ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी 15,000 कोटींचे कर्ज.
– देशी गाईंच्या पालनासाठी अनुदान योजना.
– भारतीय खेळ प्राधिकरणाला नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी जागा.
– रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाण्यात जागा.
– राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापन.
– जळगाव जिल्ह्यात भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता.
– लातूरमध्ये विविध बंधाऱ्यांच्या कामास मान्यता.
– धुळ्यातील बीएपीएस स्वामीनारायण संस्थेसाठी जमीन.
– झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती.
– केंद्राच्या मिठागर जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित.
– पालघर जिल्ह्यात मुरबे येथील बहुउद्देशीय बंदर प्रकल्प.
– धारावीत अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडे योजना.
– सेवानिवृत्ती व मृत्यू उपदानाची मर्यादा 20 लाख करण्याचा निर्णय.
– अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेत सुधारणा.
– सोनार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ.
– जामखेडच्या सूत गिरणीला अर्थसहाय्य.
– होमगार्डच्या भत्त्यात वाढ, 40,000 होमगार्डना लाभ.
– नाशिकमधील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सरकारच्या अखत्यारीत.
– आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती.
– 26 नवीन आयटीआय संस्थांचे नामकरण.
– आर्य वैश्य समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ.
– श्री सिद्धिविनायक मंदिर समितीतील सदस्य संख्या वाढविणे.
– कर्मचाऱ्यांचा एक (Mantrimandal nirnay 30 September) दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित.
– ‘वनार्टी’ स्वायत्त संस्थेची स्थापना.
– मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत.
– जिल्हा परिषदेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळचा पर्याय.
– पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत.
– विशेष शिक्षक पदाची निर्मिती, 4,860 पदे.
– शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय.
– अवयवदान व प्रत्यारोपणासाठी यंत्रणा स्थापन.
– माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला.
– सैनिकी शाळांसाठी सुधारित धोरण.
– डाळिंब व सीताफळ इस्टेट उभारणी.
– महसुली उत्पन्न वाढीसाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा.
तसेच SSC व HSC परीक्षा फी किती रूपयांनी वाढली? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.
5 thoughts on “Mantrimandal nirnay 30 September: आज मंत्रिमंडळाने कोणते ३८ निर्णय घेतले?”