Msp increase by central government
भारत, १६ आक्टोबर २४: केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीचा उपहार दिला आहे. २०२५-२६ च्या रबी हंगामासाठी सहा पिकांच्या हमीभावात म्हणजे MSP मध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी चांगला दर मिळणार असून कृषी क्षेत्रात सुधारणा होणार आहे. वाढीव हमीभाव मिळालेल्या पिकांमध्ये पुढील पिकांचा जसे की गहू, जवस, हरभरा, मसूर, मोहरी आणि केसर यांचा समावेश आहे.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयांची (Msp increase by central government) माहिती दिली.
या निर्णयांनुसार, गव्हाची किमान आधारभूत किंमत १५० रुपयांनी वाढवून २,४२५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. याशिवाय, मोहरीचा हमीभाव ३०० रुपयांनी वाढून ५,९५० रुपये आणि हरभऱ्याचा हमीभाव २१० रुपयांनी वाढून ५,६५० रुपये केला गेला आहे. तसेच, जवस, मसूर, आणि केसराचा हमीभाव देखील अनुक्रमे १,९८० रुपये, ६,७०० रुपये आणि ५,९४० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे.
या निर्णयांचा (Msp increase by central government) उद्देश कृषी क्षेत्राला समर्थन देणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आहे.
तसेच ‘या’ कर्मचाऱ्यांना सरकारने दिली मोठी खुशखबर! त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
1 thought on “Msp increase by central government: केंद्र सरकारची शेतकऱ्यांना ‘ही’ दिवाळी भेट!”