Mumbai senate election results
महाराष्ट्र, २७ सप्टेंबर २४: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत २४ सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानुसार, ठाकरे गटाची युवा सेना या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून स्पष्ट विजयी ठरली आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार, युवासेनेच्या ८ उमेदवारांनी निवडणूक जिंकली आहे. ही निवडणूक ठाकरे गटाच्या युवासेने आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामध्ये खूपच चुरशीची होती. या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये कडाक्याची स्पर्धा होती. ठाकरे गटाच्या युवा सेनेने ८ जागा जिंकल्याने भारतीय विद्यार्थी परिषदाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीचा निकाल अजून पूर्ण झाला नसला तरी युवा सेनेची स्थिती मजबूत दिसत आहे. लवकरच सर्व निकाल (Mumbai senate election results) जाहीर होतील.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 13,406 मतदारांपैकी 55% मतदारांनी मतदान केले. मतमोजणीच्या प्रक्रियेत 7200 मते प्राप्त झाली, त्यापैकी 6684 मते वैध ठरली. या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला विजयी होण्यासाठी किमान 1114 मते मिळवणे आवश्यक आहे.
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात काल काय झाले? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.
👉👉 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात काल काय झाले? 👈👈
1 thought on “Mumbai senate election results: आजच्या कोणत्या निवडणूकीच्या निकालात ठाकरे गटाला सर्वात जास्त जागा?”