Namo shetkari mahasanman nidhi 5th installment date: नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढचा हप्ता कोणत्या तारखेला येणार?

Namo shetkari mahasanman nidhi 5th installment date

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, ०३ ऑक्टोबर २४: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधीचा 5वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन्ही हप्ते एकाच वेळी वितरित केले जातील. यासाठी राज्य सरकारने 2,254 कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास मान्यता दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एकाचवेळी दोन्ही हप्ते मिळतील.

देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना जून महिन्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या 17व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले, ज्यासाठी केंद्र सरकारने 20,000 कोटी रुपयांचा निधी दिला. नमोच्या 4था हप्ता केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते परळीच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात वितरित करण्यात आला. त्या वेळी राज्य सरकारने निधीसाठी तात्काळ मान्यता दिली, आणि त्यामुळे तो निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांना चौथा हप्ता मिळाला नाही, अशी तक्रार होती. आता, राज्य (Namo shetkari mahasanman nidhi 5th installment date) सरकारच्या निर्णयानुसार, पात्र शेतकऱ्यांचे प्रलंबित हप्ते 5 ऑक्टोबर रोजी वितरित केले जाणार आहेत.

तसेच लाडक्या बहीणींना का मिळणार १० तारखेला ३००० रुपये? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 लाडक्या बहीणींना का मिळणार १० तारखेला ३००० रुपये? 👈👈

Leave a Comment