New date soyabean cotton anudhan
महाराष्ट्र, २९ सप्टेंबर: राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप खरीप हंगामातील अनुदान मिळालेले नाही. राज्य सरकारकडून अनुदान वितरणाची तारीख वारंवार बदलली जात आहे. रविवारी कृषी विभागाने अनुदान वितरणाचा दावा केला होता, परंतु आता कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही दिली. त्यांनी सांगितले की, सोमवारी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना १० हजार रुपये दिले जातील, ज्याचा लाभ सुमारे ६५ लाख शेतकऱ्यांना मिळेल.
राज्य सरकारच्या कृषी विभागाने रविवारी २०२०, २०२१ आणि २०२२ च्या कृषी पुरस्कारांचे वितरण केले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मानपत्र व पुरस्कार सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसेच मंत्री दादा भुसे आणि दीपक केसरकर आणि कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानावर चर्चा केली.
यावेळी मुंडे यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे ९६ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे, आणि या ६८ लाख शेतकऱ्यांनाच अनुदान मिळेल. प्रत्येक हेक्टरवर ५ हजार रुपये, अधिकतम १० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. सोमवारी ६५ लाख शेतकऱ्यांमध्ये २,५०० कोटी रुपयांचे वितरण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंडे यांनी पुढे म्हटले की, शेतकऱ्यांच्या (New date soyabean cotton anudhan) आनंदात त्यांचा आनंद आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले, कारण त्यांनी कमी वयात कृषिमंत्रालयाची जबाबदारी दिली. शेतकऱ्यांच्या कष्टांमुळे राज्य कृषि क्षेत्रात चांगले बनले आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या (New date soyabean cotton anudhan) कार्यक्रमात राज्यपालांनी कमी वेळ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गोंधळ वाढल्याने कार्यक्रम थांबवण्यात आला, पण राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वांना पुरस्कार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. हा सर्व कार्यक्रम मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम) येथे आयोजित करण्यात आला होता.
तसेच धर्मवीर चित्रपटाबद्दल काय म्हणाले नितेश राणे? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.