Oriental insurance kharip 2023: कोणत्या जिल्ह्यात मिळणार खरीप-२०२३ साठीचा पीक विमा?

Oriental insurance kharip 2023

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, ०२ आक्टोबर २४: राज्यात सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप-२०२३ साठी १ हजार ९२७ कोटी रुपये पीक विमा मिळणार आहे. या जिल्ह्यांमध्ये नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.

राज्यात पीक विमा योजनेसाठी ‘बीड पॅटर्न’ लागू केला जात आहे. या पॅटर्ननुसार, विमा भरपाई एकूण विमा हप्त्यांच्या ११० टक्क्यांपर्यंत विमा कंपनी देते; त्यापुढील भरपाई राज्य सरकार देणार आहे. यंदा ओरिएंटल कंपनीची (Oriental insurance kharip 2023) विमा भरपाई ११० टक्क्यांपेक्षा जास्त होती.

ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई एकूण विमा हप्त्यांच्या २०० ते ३०० टक्क्यांपर्यंत होती. त्यामुळे, ११० टक्क्यांपेक्षा जास्त भरपाई राज्य सरकारने देणे आवश्यक असल्याची मागणी या कंपनीने केली. ओरिएंटल विमा कंपनीला विमा हप्त्यांमुळे १ हजार २५५ कोटी रुपये मिळाले, पण विमा भरपाईची एकूण रक्कम ३ हजार ३०७ कोटी रुपये होती. ११० टक्क्यांप्रमाणे विमा कंपनीकडे भरपाईची रक्कम १ हजार ३८० कोटी रुपये होती, तर ११० टक्क्यांवरील भरपाईसाठी राज्य सरकारकडे १ हजार ९२७ कोटी रुपये मागण्यात आले.

कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा (Oriental insurance kharip 2023) भरपाईसाठी राज्य सरकारकडे १ हजार ९२७ कोटी रुपयांची मागणी केली होती. आता राज्य सरकारने ही रक्कम विमा कंपनीला दिली आहे, त्यामुळे या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग स्पष्ट झाला आहे. तसेच याबाबत शासन निर्णय तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 शासन निर्णय 👈👈

कोणत्या हंगामातील विमा भरपाई 

मागील हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांना मोठा धोका झाला होता, त्यामुळे खरीप हंगाम २०२३ (Oriental insurance kharip 2023) मध्ये विक्रमी विमा भरपाई मिळाली. शेतकऱ्यांना एकूण ७ हजार ६२१ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी विमा कंपन्यांनी आतापर्यंत ५ हजार ४६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत, आणि आता आणखी १ हजार ९२७ कोटी रुपये मिळणार आहेत.

जिल्हानिहाय किती मंजूर भरपाई 

सरकारने सहा जिल्ह्यांसाठी १ हजार ९२७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ६५६ कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यात ४७० कोटी रुपये, नगर जिल्ह्यात ७१३ कोटी रुपये, सोलापूर जिल्ह्यात २.६६ कोटी रुपये, सातारा जिल्ह्यात २७.७३ कोटी रुपये आणि चंद्रपूर जिल्ह्यात ५८.९० कोटी रुपयांची भरपाई समाविष्ट आहे.

तसेच मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाने कोणते ३८ निर्णय घेतले? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 मंत्रिमंडळाने कोणते ३८ निर्णय घेतले? 👈👈

Leave a Comment