Police arrested badlapur school owner and kotwal: अखेर त्यांना पोलीसांनी अटक केली!

Police arrested badlapur school owner and kotwal

WhatsApp Group Join Now

बदलापूर, ०३ ऑक्टोबर २४: बदलापुरातील शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर एक महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. कर्जत परिसरातून त्यांना पकडण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर या दोघांनी एक महिना पोलिसांना चकवा दिला होता. त्यांना आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कशा प्रकारे बदलापूर प्रकरणात दोषी

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक प्रकरणात शाळेचे अध्यक्ष आणि सचिव हे गुन्ह्याला उशीरा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. या दोघांवर पोलिसांना योग्य वेळी माहिती न दिल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर ते फरार झाले होते आणि न्यायालयात जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कल्याण आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत पोलिसांच्या (Police arrested badlapur school owner and kotwal) कारवाईला पाठिंबा दिला. न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांच्या कामाची दखल घेतली आहे.

तसेच लाडक्या बहीणींना का मिळणार १० तारखेला ३००० रुपये? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 लाडक्या बहीणींना का मिळणार १० तारखेला ३००० रुपये? 👈👈

Leave a Comment