Samarjeet ghatge joins rashtrawadi sharad pawar ghatge: कोल्हापुरात कोणत्या पक्षाला मोठा धक्का बसला?

Samarjeet ghatge joins rashtrawadi sharad pawar ghatge

WhatsApp Group Join Now

कोल्हापुर, ३ सप्टेंबर २४: आज कागलमध्ये भाजप नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात पदार्पण केले. कागलमध्ये त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. समरजित घाटगे (Samarjeet ghatge joins rashtrawadi sharad pawar ghatge) यांनी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला.

समरजित घाटगे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला. 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये समरजित घाटगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर घाटगे यांचा हसन मुश्रीफ यांच्याकडून पराभव झाला.

समरजित घाटगे यांनी भाजपमध्ये असताना विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार कागलला पोहोचताच मुश्रीफांची उमेदवारी जाहीर झाली. अजित पवार गटाचा महायुतीत समावेश झाल्यामुळे जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच समरजित घाटगे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत भाजपला धक्का दिला. म्हणून आज त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

तसेच केंद्राने शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी केली १४,००० कोटी रुपयांची तरतूद. त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉केंद्राने शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी केली १४,००० कोटी रुपयांची तरतूद👈👈

2 thoughts on “Samarjeet ghatge joins rashtrawadi sharad pawar ghatge: कोल्हापुरात कोणत्या पक्षाला मोठा धक्का बसला?”

Leave a Comment