Sanjay bangar son gender change
भारत, ११ नोव्हेंबर २४: भारतीय क्रिकेट टीमचे माजी ऑलराऊंडर आणि फलंदाजी कोच संजय बांगर सध्या चर्चेत आहेत. त्यांचा मुलगा आर्यन बांगरने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे, ज्यामुळे तो सर्वांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. आर्यनने सेक्स चेंज ऑपरेशन (Sanjay bangar son gender change) करून महिला रूप धारण केलं असून, तो आता अनाया म्हणून ओळखला जातो. अनाया होऊन तो आता खुश आहे. वडिलांप्रमाणे क्रिकेट विश्वात यश मिळवण्याचं त्याचं स्वप्न कदाचित पूर्ण होणार नाही, कारण पुरुष क्रिकेटपटू म्हणून त्याचं करियर संपुष्टात आलं आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडू आणि कोच म्हणून ओळखले जाणारे संजय बांगर, ज्यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट कोहलीच्या RCB संघाचे कोचिंग केले, त्यांचा मुलगा आर्यन आता अनाया म्हणून ओळखला जात आहे. त्याने आपल्या नवीन ओळखीची घोषणा केली आहे. आर्यनने अनाया होण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविवारी रात्री सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने 10 महिन्यांपासून सुरू असलेल्या हार्मोनल चेंजेसच्या प्रक्रियेचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला.
आर्यनने अनाया बनल्यानंतर म्हटलं तरी काय?
अनायाने मागील 11 महिन्यांमध्ये एचआरटी (हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी) मुळे झालेल्या शारीरिक बदलांवर आधारित एक व्हिडिओ बनवून आपला अनुभव सर्वांसमोर मांडला आहे. सर्जरीनंतर (Sanjay bangar son gender change) जवळपास 11 महिन्यांनी तिने एक वेगळी ओळख प्राप्त केली आहे. या कठीण निर्णयानंतर, तिला क्रिकेट सोडावा लागणार असल्याचे ती सांगते. “ज्या खेळावर मी प्रेम करत होतो, त्याला सोडण्याचा विचार कधीच केला नव्हता. हार्मोनल चेंजेसनंतर, ट्रान्स महिला होऊन, शारीरिकदृष्ट्या खूप बदल झाले आहेत. स्त्री होऊन, मांसपेशी, ताकद आणि एथलेटिक क्षमता कमी झाल्याचं मला जाणवत आहे. मी ज्या खेळावर प्रेम केलं, तो आता माझ्यापासून दूर जात आहे,” असं अनायाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.
तसेच बापरे ‘या’ अभिनेत्याने कोणा करता केलं जोरदार भाषण? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.