Sharad Pawar and UBT ghat will leave ex mla: शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का! ‘हे’ नेते सोडु शकतात सोबत

Sharad Pawar and UBT ghat will leave ex mla

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, २ डिसेंबर २४: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागा जिंकणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Sharad Pawar and UBT ghat will leave ex mla) यांच्या पक्षांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय राहुल जगताप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटातील माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही अजित पवारांची भेट घेतल्याने तेही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

राहुल जगताप यांची भूमिका: 

राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे राहुल जगताप यांनी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. ते श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या निर्णयानुसार ही जागा उद्धव ठाकरे गटाला दिली गेली. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या लढतीत भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर जगताप यांना पराभव पत्करावा लागला. आता ते अजित पवार यांच्या गटात सामील होण्याच्या तयारीत असल्याचे कळते, ज्यामुळे शरद पवार (Sharad Pawar and UBT ghat will leave ex mla) यांना राजकीय फटका बसणार आहे.

अपूर्व हिरे यांची भूमिका: 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही मुंबईत अजित पवारांची भेट घेतली आहे. आधी अजित पवार गटात असलेल्या अपूर्व हिरे यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघात आपल्या बंधू अद्वय हिरे यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र, या मतदारसंघात दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांचा मोठा पराभव केला. आता अपूर्व हिरे पुन्हा अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक निकालाचे परिणाम: 

महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. शरद पवार यांच्या पक्षाला फक्त 10 जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीच्या एकूण जागा 50 पेक्षा कमी आहेत. दुसरीकडे, अजित पवार यांच्या गटाने 41 जागा जिंकल्या, तर भाजपने 90% स्ट्राइक रेटसह 132 जागा मिळवल्या. शरद पवार यांच्या पक्षासाठी हा निवडणुकीतील सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे, कारण त्यांच्या पक्षाने इतक्या कमी जागा यापूर्वी कधीच जिंकल्या नव्हत्या.

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला दिला ‘हा’ इशारा! त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 मनोज जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला दिला ‘हा’ इशारा! 👈👈

1 thought on “Sharad Pawar and UBT ghat will leave ex mla: शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का! ‘हे’ नेते सोडु शकतात सोबत”

Leave a Comment