Sharad pawars exit poll predictions: शरद पवारांनी त्यांच्या मनातील एक्झिट पोलचा आकडा सांगितला! संपूर्ण माहिती बघा

Sharad pawars exit poll predictions

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, २२ नोव्हेंबर २४: शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक घेतली, ज्यामध्ये राज्यभरातील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत विविध तज्ज्ञांनी आपापले अंदाज व्यक्त केले आहेत. एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांचे आकडेही जाहीर झाले असून, त्यानुसार महायुतीला सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या राजकारणातील अनुभवी नेते शरद पवार (Sharad pawars exit poll predictions) यांनीही आपला अंदाज व्यक्त केला आहे.

शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक घेतली, ज्यामध्ये राज्यभरातील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार सहभागी झाले. या बैठकीत एक्झिट पोलवर चर्चा झाली. यावेळी शरद पवारांनी उमेदवारांना एक्झिट पोलचा ताण घेऊ नका, असा सल्ला दिला. त्यांनी महाविकास आघाडीला १५७ जागा मिळतील असा विश्वासही व्यक्त केला.

जोपर्यंत निकाल जाहीर होत नाहीत, तोपर्यंत उमेदवारांना मतमोजणी केंद्र सोडू नका, असा आदेश शरद पवार (Sharad pawars exit poll predictions) यांनी दिला आहे. त्यांनी जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई पोहोचण्याची व्यवस्था करण्याचा सल्ला देखील दिला. ग्रामीण भागातील आमदारांसाठी मविआने राहण्याची व्यवस्था केली आहे. शरद पवारांनी १५७ जागांचा अंदाज दिल्यामुळे, उर्वरित जागा महायुती, अपक्ष आणि इतर पक्षांना जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्तास्थापनेसाठी १४५ जागांची आवश्यकता आहे आणि पवार यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीला त्या पेक्षा १२ अधिक जागा मिळतील. अनेक एक्झिट पोल्समध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे, त्यामुळे खरे काय ते २३ नोव्हेंबरला समजणार आहे.

तसेच बापरे ‘या’ ठिकाणी भाजपाला मोठा धक्का! सचिवांनी केला दुसऱ्या पक्षात प्रवेश त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 बापरे ‘या’ ठिकाणी भाजपाला मोठा धक्का! सचिवांनी केला दुसऱ्या पक्षात प्रवेश 👈👈

Leave a Comment