Solapur ballot papar election news: ‘या’ ठिकाणी चालू होते बॅलेट पेपरवर मतदान पण पोलिसांनी येऊन थांबवलं! कारण काय?

Solapur ballot papar election news

WhatsApp Group Join Now

सोलापूर, ३ डिसेंबर २४: माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने मतदान झाले तर साहित्य जप्त करून गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला. यामुळे आमदार उत्तम जानकर यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.

ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमबाबत शंका व्यक्त करून बॅलेट पेपरवर (Solapur ballot papar election news) मतदानाची मागणी केली होती. प्रशासनाने ही मागणी फेटाळली, तरी ग्रामस्थ आपल्याच भूमिकेवर ठाम होते. आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की, “जर मतदानाचे साहित्य जप्त होणार असेल आणि गोंधळ निर्माण होणार असेल, तर ही प्रक्रिया पुढे नेण्याचा उपयोग नाही. प्रशासनाच्या भूमिकेमुळे हे मतदान होऊ शकले नाही. पुढील ८-१० दिवसांत आम्ही २५ ते ३० हजार लोकांसह प्रांत कार्यालयात न्यायासाठी धडक देऊ.”

जानकर यांनी आरोप केला की, ईव्हीएममुळे मतांचे चुकीचे स्थानांतर झाले आहे. “गावकऱ्यांनी दिलेली मते मला न जाता दुसऱ्याला कशी गेली, हा प्रश्न होता. पण प्रशासनाने त्यावर सहकार्य करण्याऐवजी जमावबंदीचे आदेश जारी केले आणि प्रक्रिया थांबवली. मतदानाच्या साहित्यावर नियंत्रण ठेवण्याच्या धोरणामुळे न्याय मागणे कठीण झाले आहे.”

तसेच, जानकर यांनी स्पष्ट केले की, गावकऱ्यांना बॅलेट पेपरवर मतदान (Solapur ballot papar election news) करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी ते मुक्कामाला होते. गावाने स्वखर्चाने प्रक्रिया राबवली होती आणि पोलीस बंदोबस्ताची मागणी केली नव्हती. त्यांनी सांगितले की, “प्रशासनाने ही प्रक्रिया अडवली असून, २० दिवसांत मतांचे हस्तांतरण कसे झाले ते दाखवू आणि गावकऱ्यांना न्याय मिळवून देऊ.”

ग्रामस्थांच्या बैठकीत पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. जानकर यांनी सांगितले की, संघर्ष टाळण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा दिला जाईल. त्यामुळे मारकडवाडी येथील बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली.

तसेच आजचे राशी भविष्य (३ डिसेंबर २०२४) त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 आजचे राशी भविष्य (३ डिसेंबर २०२४) 👈👈

1 thought on “Solapur ballot papar election news: ‘या’ ठिकाणी चालू होते बॅलेट पेपरवर मतदान पण पोलिसांनी येऊन थांबवलं! कारण काय?”

Leave a Comment