Soyabean cotton new GR: सोयाबीन/कापुस ५००० रू अनुदानाच्या वितरणाबद्दल कालच्या GR मध्ये काय सांगितले?

Soyabean cotton new GR

कालच्या GR मध्ये अनुदानाची पध्दत खालील प्रमाणे दर्शविली आहे

WhatsApp Group Join Now

तसेच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण (Soyabean cotton new GR) GR बघु शकता.

👉👉 शासन निर्णय 👈👈

(Soyabean cotton new GR)

(१) जमाबंदी आयुक्त, कायालयाकडून ई-पीक पाहणी पोर्टलवरील वर्ष २०२३ खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिकाच्या पेर्याची नोंद झालेल्या शेतक-यांची माहिती / डेटा MahaIT च्या Cloud वर प्राप्त झालेली आहे. 

(२) प्राप्त झालेली माहिती / डेटा आयुक्त, कृषी यांच्या कायालयाकडून जिल्हा, तालुका निहाय छानणी करून क्षेत्रीय कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदरची उपलब्ध माहिती कृषी सहाय्यकामार्फत गावनिहाय त्या-त्या गावांमध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनीभागात ठळकपणे लावण्यात येईल.

(३) या प्राप्त माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांची संपूर्ण माहिती जसे की नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकन प्रतीसह कृषी सहाय्यकांकडे पाठवून द्यावी.

(४) सामायिक शेती खातेदारांबाबत त्यांचे सामायिक शेतीच्या खात्यावरील क्षेत्रानुसार अनुज्ञेय असणारी पूर्ण रक्कम, सदर सामाईक खात्यातील एका खातेदाराला नावावर इतर सह हिस्सेदार यांच्या संमतीने जमा करण्यात येईल. त्या साठी एकाच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास काहीच हरकत नसल्याबाबत संबंधित सर्व खातेदारांनी नाहरकत प्रमाणपत्रात त्यांचे ना- हरकत पत्र आणि ज्यांच्या नावावर मदतीची रक्कम जमा करावयाची आहे, त्या एका व्यक्तीचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांनकत प्रतीसह संबंधित कृषी सहाय्यकांकडे द्यावी.

(५) शेतकऱयांकडून जे प्राप्त झालेले संमती पत्र व ना हरकत पत्र असतील ते तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय एकत्र करुन जतन करण्यात येईल.

(६) MahaIT ने तात्काळ वेब पोर्टल नव्याने विकसित करुन वरीलप्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुक्याच्या स्तरावूनन या पोर्टलवर घेऊन तो प्रमानर्त कूनन घ्यावयाचा आहे. प्राप्त झालेल्या या माहितीचे आधार प्रमाणिकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टल द्वारे करण्यात येईल. यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे का नाही, तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे याची खातरजमा होईल.

(७) MahaIT ने ई-पीक पाहणी पोर्टरलवरील संबंधित शेतक-याचे नाव आणि आधार कार्ड प्रकारे नाव जुळवणी (Matching) करावी. त्यासाठीचे Matching percentage 90 टक्के पयंत अनुज्ञेय ठेवावे, eKYC झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक PM-KISAN/ नमो शेतकरी डेटासेटशी जुळवावेत व उरलेल्या अर्जासाठी नव्याने eKYC करण्यात येईल. 

सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुज्ञेय अर्थसहाय्याची मदत व पुनवर्सन विभागाकडून अनुसरण्यात येणार्या कार्यपद्धती नुसार करण्याच्या अनुशंगाने वेब पोर्टलचे विकसित करण्यात येईल.

(८) कृषी सहाय्यक, तालुकास्तरीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना या संपूर्ण कार्यपद्धती, वेब पोर्टलच्या वापर इत्यादीचे अभिमुख (Orientation) देण्यात येईल.

(९) MahaIT कडून तयार झालेल्या या पोर्टलवर संबंधित कृषी सहायकांना login चा access देऊन ज्याद्वारे कृषि सहाय्यकांना त्यांच्याशी संबंधित गावांचा डेटा व माहिती भरण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल.

(१०) कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतक-यांचा आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक व नाव (आधार कार्ड प्रमाणे) इ.माहिती प्रविष्ट करेल.

(११) सदर माहिती तालुकास्तरीय कृषी अधिकारी यांच्या लॉगीन मधून पोर्टल यादृक्च्छक पध्दतीने (Randomly) तपासली जाईल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठविण्यात येईल. 

(१२) सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अकांउट लॉगीन मधून पोर्टल यादृच्छिक पध्दतीने (Randomly) तपासली जाईल व आयुक्त कृषी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठनवण्यात येईल.

(१३) प्रत्येक तालुक्यामधील दोन गावांची माहिती व त्यांना अर्थसहाय्याबाबत उप विभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून तपासली जाईल.

(१४) आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलद्वारे अनुज्ञेय अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीयकृत बँके च्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याच्या आधार कार्ड बँक खात्यामध्ये वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

वर दिलेली संपूर्ण माहिती ही (Soyabean cotton new GR) नवीन शासन निर्णयानुसार दिलेली आहे.

तसेच पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात येवून माफी का मागितली त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये येवून माफी का मागितली?👈👈

Leave a Comment