Stamp paper price increases: सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ! आता स्टॅम्प पेपरसाठी किती रूपये मोजावे लागणार

Stamp paper price increases

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र, ०३ ऑक्टोबर २४: राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे त्याचा फटका स्टॅम्प पेपर विकत घेणाऱ्यांना बसणार आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या मुद्रांक शुल्कवाढीनंतर (Stamp paper price increases) आता रूपये १००, २०० नाहीतर ५०० रूपये स्टॅम्प पेपरसाठी मोजावे लागणार आहेत. स्टॅम्प पेपर हा खरेदी खत, हक्क सोडपत्रासाठी आता ५०० रूपये मुंद्राक शुल्क मोजावं लागणार आहे. 

पूर्वी दस्त नोंदणीसाठी किमान १०० रुपये मुद्रांक शुल्क द्यावे लागायचे. परंतु राज्य सरकारने यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता १०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाईल. उदाहरणार्थ, सदनिकांच्या विक्री व्यवहारासाठी १०० रुपये शुल्क होते, ते आता ५०० रुपये करण्यात आले आहे. सुमारे १२ प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी १०० ते २०० रुपये शुल्क होत होते, परंतु आता त्यासाठी किमान ५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

तसेच लाडक्या बहीणींना का मिळणार १० तारखेला ३००० रुपये? त्याची संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघु शकता.

👉👉 लाडक्या बहीणींना का मिळणार १० तारखेला ३००० रुपये? 👈👈

1 thought on “Stamp paper price increases: सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ! आता स्टॅम्प पेपरसाठी किती रूपये मोजावे लागणार”

Leave a Comment